ताज्या बातम्या

Ambadas Danve : सातारा महिला डॉ आत्महत्याप्रकरणी अंबादास दानवेंचा माजी खासदार निंबाळकरांवपर आरोप

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • अंबादास दानवेंचा माजी खासदार निंबाळकरांवपर आरोप ,

  • PSI महाडिकांवर कारवाई व्हावी अंबादास दानवेंची मागणी

  • सुसाईड नोटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसाठी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. मृत डॉक्टर तरुणीने डॉ. धुमाळ यांना लिहलेल्या पत्रात स्पष्टपणे त्याचा उल्लेख केला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी पोलिसांकडून येथील डॉक्टरांवर दबाव आणला जायचा. अशाच एका प्रकरणात फलटणमधील भाजपच्या माजी खासदाराचे दोन स्वीय सहाय्यक (PA) रुग्णालयात गेले होते. या दोघांनी डॉक्टर तरुणीचे माजी खासदाराशी बोलणे करुन दिले. यावेळी खासदारांच्या पीएने आणि पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने संबंधित तरुणीला ती बीडची असल्यावरुन हिणवले, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. ते शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Satara Crime news)

यावेळी अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा आरोप केला. तरुणीच्या पत्रात माजी खासदारांच्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची नावे दिलेली नाहीत. ही नावं मी तुम्हाला सांगतो. राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे दोघे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पीए होते. त्यांनीच डॉक्टर तरुणीचे माजी खासदारांशी फोनवरुन बोलणं करुन दिलं. याच दबावातून तरुणीने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

हा सगळा प्रकार पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे, त्यांचे खात्याचे लोक कशाप्रकारे डॉक्टरांशी वागतात, हे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये सत्तेचा माज दिसतो. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी प्रामाणिकपणे आपले काम करत होती. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील अधिकारी चौकशीसाठी नको. महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी करा. तसेच महाडिक नावाच्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करा. काही दिवसांपूर्वी महाडिक हा अधिकारी प्रमोशन होऊन डीवायएसपी म्हणून नंदूरबारला गेला. महाडिक हा अधिकारी माजी खासदारांचा दलाल होता, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

हे एक प्रकरण समोर आले आहे. पण अन्य प्रकरणांमध्ये पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यास सांगितले जायचे. अनेकदा कैद्यांना फिट करा किंवा अनफिट प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांवर पोलिसांकडून दबाव आणला जायचा. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी हा प्रकार करणे चूक आहे. ही भाजपची सत्तेची मस्ती आहे. माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत नाईक निंबाळकर हे 24 तास तहसीलदार, प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत असतात. याने शेतकऱ्यांच्या खात्यावर गैर उत्खनन केलं म्हणून याने 1 कोटी रुपये पर्यंत बोजा चढवला आहे. वाठार निंबाळकर आणि वाखरी या गावातील शेतकरी आहेत यांच्यावर 1 कोटी रुपयांचा गैर उत्खनन प्रकरणी बोजा चढवला आहे. अभिजीत निंबाळकर याने हा खोटा प्रकार केला आहे. सत्तेचा माज दाखवून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना अशाप्रकारे नामोहरम केले जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा