थोडक्यात
अंबादास दानवेंनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरुन मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्वीटरच्या माध्यामातून सवाल केले.
चोराने चोरी केली आणि ती धरली गेली.. धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल तर ती चोरी होत नाही का?
काय लिहिलंय अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये
अंबादास दानवेंनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवरुन मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्वीटरच्या माध्यामातून सवाल केले आहे. चोराने चोरी केली आणि ती धरली गेली.. धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल तर ती चोरी होत नाही का?
काय लिहिलंय अंबादास दानवेंनी ट्विटमध्ये,
अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे
'जोक ऑफ द डे' आहेत...
इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल..
डबल इंजिनकी सरकार..
भ्रष्टाचार करेंगे धुवांधार..