ताज्या बातम्या

Ambadas Danve : भाजपवर राज ठाकरेंनी कधी वार केला का?- अंबादास दानवे

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, भाजपवर राज ठाकरेंनी कधी वार केला का?

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा खळबळ उडाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. राज ठाकरे यांचे वक्तव्य आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये मला काही फार कठिण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, "असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, "माननीय पक्षप्रमुख अशा भूमिका सगळ्यांशी चर्चा करुन घेत असतात. या महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं . मांजरेकरांनी मुलाखत किती तारखेला घेतली. नुसती चॅनेलवर मुलाखत घेतली म्हणून हे विषय व्हावा असं मला वाटत नाही. दोन्ही नेत्यांकडे बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ यंत्रणा आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यामध्ये अडथळा टाकण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला होता. 2019 वेळी त्यासोबतच 2024 च्यावेळी सांगितले. राज्याच्या हितासाठी केला पाहिजे, मात्र भारतीय जनता पार्टीचे हितासाठी नसून त्यांनी शिवसेना फोडली. भाजपवर राज ठाकरेंनी कधी वार केला का? यांचे लोक त्यांना भेटतात मग मला वाटत नेमक करायचं काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संजय शिरसाठ यांचा संबंध काय? मुख्यमंत्री फडणवीसांनी काल संभाजीनगरात महाराणा प्रतापांचा पुतळ्याचे अनावरण केले आहे".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर