ताज्या बातम्या

26/ 11 Terrorist Attacks : 26/11 हल्ल्यातील शहीदाच्या वीर पत्नीची थेट पोलीस उपअधीक्षकपदी

26/11 हल्ल्यातील शहीदाची पत्नी कल्पना पवार DySP: महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Published by : Team Lokshahi

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची थेट परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. या निर्णयाच्या माध्यमातून शासनाने शहीद पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती असलेली कृतज्ञता, संवेदनशीलताआणि बांधिलकी पुन्हा एकदा कृतीतून दाखवली आहे.

नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”

शिपाई अंबादास पवार हे 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले धाडसी पोलीस कर्मचारी होते. ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होते. 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी आपल्या कर्तव्यावर असताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र अभिनंदनाचे आणि कौतुकाचे सूर उमटत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा