Ambernath Crime News Team Lokshahi
ताज्या बातम्या

अंबरनाथमध्ये बिल्डरने स्वत:वरच गोळीबार करण्याचा रचला डाव; एक चूक झाली अन्...

अंबरनाथमधील कमरुद्दीन खान या बिल्डरवर 24 एप्रिल रोजी त्याच्या कार्यालयात गोळीबार झाला होता.

Published by : Sudhir Kakde

अंबरनाथ |मयुरेश जाधव :

शहरामध्ये काही दिवसांपूर्वी बिल्डरवर गोळीबार (Firing on Builder) झाला होता. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. कारण या गोळीबार प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळालं आहे. ज्याच्यावर गोळीबार झाला, त्या बिल्डरने स्वत: हा प्रकार घडवून आणलल्याचं समोर आलं आहे. प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी स्वतःहून गोळीबार करवून घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या बिल्डरविरोधात (Ambernath Builder Attack Case) कट रचण्यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरु केला आहे.

अंबरनाथमध्ये 24 एप्रिल रोजी कमरुद्दीन खान या बिल्डरवर गोळीबार झाला होता. अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगावमधील मुकूल पाल्म सोसायटीत कमरुद्दीन खान याचं ऑफिस आहे. याठिकाणी कमरुद्दीन बसलेला असताना खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने २ गोळ्या झाडल्या होत्या. हा गोळीबार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या प्रकरणाची अंबरनाथमध्ये चर्चा झाली. मात्र आता या गोळीबारामागील कारण समोर आलं आहे. सुरुवातीला प्रतिस्पर्धी बांधकाम व्यावसायिक नियाज सिद्दीकी याने हा गोळीबार केल्याचा आरोप कमरुद्दीनने केला होता. मात्र आता या प्रकरणातील खरा आरोपी समोर आला आहे.

पोलिसांनी कमरुद्दीन याच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद आणि किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमरुद्दीन यानेच स्वतःवर गोळीवर करवून घेतल्याचं समोर आलं आहे. कमरुद्दीन यानं मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद याच्या माध्यमातून किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग याला बंदूक आणि दारुगोळा पुरवला. त्यानंतर त्याच्याकडून स्वतःवर गोळीबार करवून घेतला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या अन् आरोपींनी सगळा कट पोलिसांना सांगितला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली