ताज्या बातम्या

America Visa : अमेरिकेतील 50 टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द, सरकार काय पाऊल उचलणार ?

व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 टक्के विद्यार्थी चीनचे आहेत.

Published by : Shamal Sawant

अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता टांगती तलवार आहे. अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ज्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत किंवा स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टममधून नोंदणी रद्द केली आहे, त्यापैकी सुमारे 50 टक्के विद्यार्थी भारतातील आहेत.

अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने विद्यार्थी, वकील आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणांवर 327 अहवाल गोळा केले आहेत. यातून ही माहिती समोर आली आहे. व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 टक्के विद्यार्थी चीनचे आहेत. व्हिसा रद्द करण्यात आलेल्या इतरांमध्ये दक्षिण कोरिया, नेपाळ आणि बांगलादेशच्या विद्यांर्थ्यांचाही समावेश आहे.

OPT विद्यार्थ्यांना फटका :

अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या अहवालात असेही म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यापैकी 50 टक्के विद्यार्थी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर होते. मिळालेल्या माहितीनुसार, 4736 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा स्टेटस रद्द करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक F-1 व्हिसा धारक होते.

AI चा वापराने माहिती :

चार महिन्यांपासून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय (US State Department) आणि इमिग्रेशन अ‍ॅण्ड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या संस्था आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची माहिती तपासत आहेत. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि राजकीय सक्रियतेवरही लक्ष ठेवले जात आहे. काही तज्ञांच्या मते, ही तपासणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जात आहे, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने गुन्हेगारी इतिहास नसलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा