ताज्या बातम्या

अमेरिकेचा मोठा निर्णय! गांजा बाळगल्याबद्दल तुरुंगवास होणार नाही

गांजा बाळगल्याबद्दल तुरुंगवासात असणारे हजारो अमेरिकन नागरिक होणार मुक्त

Published by : Shweta Shigvan-Kavankar

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. गांजा बाळगल्याबद्दल दोषी ठरलेल्या हजारो अमेरिकन लोकांना त्यांनी माफी दिली आहे. हा निर्णय संबंधित कलंक पुसण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. जो बिडेन यांनी मध्यावधी निवडणुकीच्या एक महिना आधी आपले वचन पूर्ण केले आहे.

जो बिडेन म्हणाले की, मी फक्त गांजा बाळगल्याबद्दल तुरुंगात असलेल्या सर्वांना माफी जाहीर केली आहे. ज्यांनी दुसरा कोणताही गुन्हा केलेला नाही. केवळ त्यांच्यासाठीच ही माफी आहे. परंतु, गांजाची तस्करी, मार्केटींग आणि लहान मुलांना विक्री करण्यावरील मर्यादा कायम आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, वैयक्तिकरित्या गांजा बाळगण्यास त्यांनी समर्थन दर्शविले आहे. माफीच्या व्यतिरिक्त बिडेन यांनी न्याय आणि आरोग्य मंत्रालयाला गांजा पुन्हा वर्गीकृत करण्याचे निर्देश दिले.

केवळ गांजा बाळगण्यासाठी कोणीही अमेरिकन तुरुंगात राहू नये. केवळ गांजा बाळगल्याबद्दल कोणालाही स्थानिक तुरुंगात किंवा राज्याच्या तुरुंगात पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी सर्व राज्यपालांना केले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील सरकारी अधिकार्‍यांच्या मते, 2019 मध्ये 18 टक्के लोकसंख्येचा वापर गांजासाठी झाला. अमेरिकेतील अनेक राज्यांच्या सरकारने रिक्रिएशनल किंवा वैद्यकीय हेतूंसाठी गांजाला मान्यता दिली आहे. सुमारे 6,500 लोकांवर थेट अमेरिकेच्या गांजाच्या बाळगण्याचा आरोप होता. जो बिडेन यांच्या कायद्यानुसार या माफीमुळे आणखी हजारो दोषींना दिलासा मिळणार आहे. मात्र, बिडेन यांच्या या प्रयत्नाचा सरकारी यंत्रणांवरही परिणाम होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा