ताज्या बातम्या

Ameya Khopkar : 'अशी अभद्र युती...'; अमेय खोपकरांचा राज-उद्धव एकत्र येण्याला कडाडून विरोध ?

राज्यात ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या त्यावर प्रतिक्रिया समोर येत आहे.

Published by : Rashmi Mane

राज्यात ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या त्यावर प्रतिक्रिया समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. आता त्यावर शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सर्व स्तरातून दोघांच्या एकत्रित येण्याच्या संकेताचे स्वागत होत असतानाच मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी मात्र संभ्रमात टाकणारे ट्विट केले आहे. त्यांनी अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना, अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला त्यांनी एकप्रकारे विरोध दर्शवला आहे.

अशीच काहीशी प्रतिक्रिया मनसेचे संदीप देशपांडे यांनीही दिली आहे. ज्या शिवसेनेने भाजपला धोका दिला. ती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटालाही धोका देणार, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज-उद्धव युतीवर एकीकडे शिवसेना नेत्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्यानंतर मनसेने मात्र नकारात्मक मतं मांडली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा