Shilpa Shetty Case : कोर्टाचा दणका मिळताच शिल्पा शेट्टीचा यूटर्न; नियोजित विदेश दौरा रद्द करत घेतला 'हा' मोठा निर्णय Shilpa Shetty Case : कोर्टाचा दणका मिळताच शिल्पा शेट्टीचा यूटर्न; नियोजित विदेश दौरा रद्द करत घेतला 'हा' मोठा निर्णय
ताज्या बातम्या

Shilpa Shetty Case : कोर्टाचा दणका मिळताच शिल्पा शेट्टीचा यूटर्न; नियोजित विदेश दौरा रद्द करत घेतला 'हा' मोठा निर्णय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा सध्या एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, शिल्पा शेट्टीने नियोजित विदेश दौरा रद्द करण्याचा अचानक निर्णय घेतला आहे.

Published by : Riddhi Vanne

Shilpa Shetty Case : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा सध्या एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, शिल्पा शेट्टीने नियोजित विदेश दौरा रद्द करण्याचा अचानक निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या प्रश्नांना उत्तर न देणे आणि ठोस माहिती न देता परवानगीची अपेक्षा ठेवणे, शिल्पासाठी महागात पडल्याचं चित्र उभं राहिलं आहे.

फक्त कॉल्सचा उल्लेख पुरेसा नाही – कोर्टाची ठाम भूमिका

विदेशात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तिच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, हा दौरा व्यावसायिक स्वरूपाचा असून आयोजकांशी फोनवर चर्चा झाली आहे. मात्र, कोर्टाने "फक्त फोन कॉल्सचा उल्लेख आमच्यासाठी अपुरा आहे. तुम्ही आयोजकांचे नंबर द्या, आम्ही स्वतः पडताळणी करू," अशी स्पष्ट भूमिका घेतली.

कोर्टाने माहिती मागताच शिल्पाचा पवित्रा बदलला

कोर्टाने आयोजकांचा संपर्क क्रमांक मागितल्यानंतर शिल्पा शेट्टीने थेट यूटर्न घेतला आणि तिने विदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तिच्या वकिलांनी न्यायालयात कळवलं की, परवानगी न मिळाल्याने आणि वेळ निघून गेल्यामुळे शिल्पा यापुढे कार्यक्रमात सहभागी होणार नाही. यासोबतच याचिकाही मागे घेण्यात आली आहे.

LOC जारी; परदेश दौऱ्यावर बंदी कायम

या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्याविरुद्ध LOC (Look Out Circular) जारी केला आहे. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जाण्यास न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. विदेशात जाण्याच्या परवानगीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, "60 कोटींची रक्कम जमा करा, मगच परवानगीचा विचार करू."

फसवणुकीचा गंभीर आरोप; गुन्हा दाखल

लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, 60 कोटी रुपयांची गुंतवणूक करून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रिया अधिक तीव्र झाली आहे.

शिल्पा-राजची अडचण वाढली

या सगळ्या घडामोडींमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. न्यायालयाचा कडक दृष्टिकोन, LOC, आणि 60 कोटींच्या रकमेचं बोजं यामुळे त्यांच्यासाठी पुढची वाट सोपी राहणार नाही, असं स्पष्ट दिसतंय. कोर्टाच्या आक्षेपांनंतर शिल्पा शेट्टीने घेतलेला यूटर्न हा एकप्रकारे परिस्थिती समजून घेतलेली माघार असल्याचं मानलं जातंय. मात्र, या प्रकरणात अजून अनेक वळणं येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा