इराण-इस्रायल युद्ध मोठ्या प्रमाणात पेटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे डागली जात आहेत आणि त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान दोन देशांमध्ये वाद सुरु असताना बांगलादेश मात्र मालामाल झाला आहे.
बांगलादेशमध्ये सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे, अनेक समस्या आहेत, त्यातच आता आर्थिक मदत मिळाल्यानं मोठी समस्या दुर झाली आहे. यादरम्यान वर्ल्ड बँक आणि आशियाई विकास बँकेकडून वर्ल्ड बँक आणि एडीबी म्हणजेच आशियाई विकास बँकेकडून बांगलादेशला 1.29 लाख कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. यावेळी आशियाई विकास बँकेकडून 90 कोटी डॉलरचे कर्ज मंजूर झाले आहे.
त्यातील 50 कोटी डॉलर हे बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी वापरले जाणार असून त्याचसोबत उरलेले 40 कोटी डॉलर हे हवामानात झालेल्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी दिले गेले आहेत. तसेच वर्ल्ड बँकेनं बांगलादेशला सुद्धा 64 कोटी डॉलरचं कर्ज मंजूर केलं आहे.
त्यामुळे या दोन्ही बँककडून मिळून तब्बल 1.29 लाख कोटी रुपये बांगलादेशच्या खात्यात जमा होणार आहे. ज्यामुळे बांगलादेशला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान यावेळी दोन्ही बॅंककडून असं सांगण्यात आलं की, बँकिंग क्षेत्रात सुधारणा, हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच इतर विकास प्रकल्पांना मदत म्हणून ही कर्ज मंजूरी देण्यात आली आहे.