amit shah 
ताज्या बातम्या

Amit Shah: कॉंग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरोधात दिल्लीसह देशभरात विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत राज्यसभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे.

Published by : Team Lokshahi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान उठवलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आजकाल फॅशन आहे. आंबेडकरांऐवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल असं या गृहमंत्री अमित शाहांच्या विधानानं गदारोळ सुरू आहे.

थोडक्यात

  • केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं

  • दिल्लीत हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक

  • महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही गदारोळ

  • विरोधकांच्या टीकेला स्वत: पंतप्रधानांचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपकडे थेट अमित शाहांची हकालपट्टी करण्याची मागणी: उद्धव ठाकरे

दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट अमित शाहांची हकालपट्टी करण्याचीच मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडे केली आहे. त्याचबरोबर रामदास आठवलेंनीही राजीनामा देऊन बाहेर पडावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बचावाचा प्रयत्न

विरोधक अमित शाहांविरोधात आक्रमक झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यांच्या बचावासाठी पुढे आले. पंतप्रधानांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

'काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरेल. भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलं आहे की कसं एका कुटंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षानं डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचीत जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटिल गोष्टी केल्या' अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा-

विरोधकांच्या गदारोळानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कॉंग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आम्ही स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करू शकत नसल्याचं अमित शाह यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

अमित शाह यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर