Anil Deshmukh Lokshahi
ताज्या बातम्या

शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या अमित शहांवर अनिल देशमुखांचा पलटवार; ट्वीटरवर म्हणाले, "भ्रष्टाचाऱ्यांच्या..."

भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचारी म्हटल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published by : Naresh Shende

Anil Deshmukh On Amit Shah : भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांमुळे भारताच्या राजकारणात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देशातील कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे, असा घणाघात शहांनी पवारांवर केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शहांवर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख ट्वीटरवर काय म्हणाले?

भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अमित शहाजी तुम्ही आज पुण्यात येऊन आदरणीय पवार साहेबांवर टीका केली. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, तुम्ही आज ज्या बालेवाडी क्रीडा नगरीत हे भाषण केलं ती क्रीडा नगरी पवार साहेबांनी उभी केली.तिथून हाकेच्या अंतरावर असणारी हिंजवडी आयटी नगरी पवार साहेबांनी उभी केली. पुण्यात असणारी सर्वात मोठी रांजणगाव आणि चाकण एमआयडीसी सुद्धा पवार साहेबांनी उभी केली.

अमित शहा शरद पवारांवर टीका करत काय म्हणाले?

शरद पवारांमुळे भारताच्या राजकारणात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. या देशातील कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. शरद पवार भ्रष्टाचाराचे प्रमुख आहेत आणि हे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. पण यावेळी शरद पवारांचं खोटं राजकारण चालणार नाही, हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित झालं आहे. प्रत्येक घरात जाऊन या खोट्या गोष्टींना उत्तर द्यायचं आहे. हे खोट बोलतील आणि भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतील. खोट्याचा पर्दाफाश करायचा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली