ताज्या बातम्या

Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : अमित शाह घेणार लालबागच्या राजाचे दर्शन, असा असेल त्यांचा मुंबई दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर अमित शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार.

Published by : shweta walge

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर अमित शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. त्यानंतर ते मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांसह काही भाजप नेत्यांच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तर, मुंबई विद्यापीठीतएका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारी दोन वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.त्यानंतर ते मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांसह काही भाजप नेत्यांच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तर, मुंबई विद्यापीठीतएका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.

राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून सत्तेत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्यावर्षी अमित शाह पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

कसा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा?

आज दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळ

3 वाजता : लालबाग राजा दर्शन

3.50 ते 4 : वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन

4 ते 4.15 : सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचे दर्शन

4.30 : वांद्रे आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणपती

5.30 ते 7 : लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रम मुंबई विद्यापीठ येथे

7 वाजता दिल्लीसाठी रवाना

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Bomb Threat : मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

Nashik : नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनावेळी सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज