जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याच राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात सांगितले होते. जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांनी वरिष्ठ सभागृहाचे कामकाज पाहिले.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अचानक गायब झाले आणि त्यांच्या गायब होण्याबाबत विरोधकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. ज्यामध्ये विरोधकांकडून सरकारने धनखड यांना गप्प केल्याचा दावा करण्यात आला होता. याचपार्श्वभूमिवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत, सत्ताधाऱ्यांच्या ते नजरकैदेत असल्याचा विरोधकांचा दावाही शहा यांनी फेटाळून लावला.
दरम्यान पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "सत्य आणि खोटेपणाचा अर्थ केवळ विरोधकांच्या विधानांवर अवलंबून नसतो. आपण या सगळ्यावर गोंधळ घालू नये. जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी संविधानानुसार आपली कर्तव्ये पार पाडली. वैयक्तिक आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. या मुद्द्यावर जास्त चर्चा होऊ नये." अस म्हणत अमित शहा यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.