राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या चर्चांवर शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून आता दोन्ही ज्युनिअर ठाकरेंनी आपलं मत मांडलं आहे. आदित्य ठाकरेंनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनीही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
अमित ठाकरे म्हणाले की, "मला वाटतं या विषयी त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही बोलून काहीही फरक पडणार नाही. दोन भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे माध्यमांसमोर बोलून, वर्तमानपत्रात बोलून अशा युत्या होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. ते एकमेकांशी बोलू शकतात. जी राजसाहेबांची इच्छा तिच माझी इच्छा."