थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Amit Thackeray) नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगी शिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी आज अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी सकाळी 11 वाजता जाणार आहेत. याच्याआधी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्प हार अर्पण करतील. यावेळी अमित ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरण
अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज अमित ठाकरे नवी मुंबईत