ताज्या बातम्या

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यावर आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं असं ?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवछत्रपतींच्या महाराजांचा हा अपमान सहन करणार नाही – अमित ठाकरे

या पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की फक्त “ नेता लोकार्पणासाठी मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही.

...हे लाजिरवाणं आहे – अमित ठाकरे

मनसेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी म्हटले की, ‘माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल. निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे.’

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा