Amit Thackeray Amit Thackeray
ताज्या बातम्या

Amit Thackeray : प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावर अमित ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया

केईएम रुग्णालयात पंकज उमासरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • केईएम रुग्णालयात पंकज उमासरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला

  • दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

  • “ दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेला लाचार वक्तव्य केलंय. मी आता येतानाच ऐकलं, किती लाचार वक्तव्य केलंय."

केईएम रुग्णालयात पंकज उमासरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

अमित ठाकरे म्हणाले की,

“ दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेला लाचार वक्तव्य केलंय. मी आता येतानाच ऐकलं, किती लाचार वक्तव्य केलंय. माफी मागितली पण माफी म्हणजे ‘आई मरूदे पण मावशी नाही’. आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय… हेच म्हणणं होतं ना?”

ते पुढे म्हणाले,

“अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. शिवसेनेने मराठी माणसासाठी राजकारण केलं, त्या पक्षातून ते येतात आणि अशी वक्तव्य? माफी मागणं हे माझ्या हातात नाही, मराठी माणसांच्या हातात आहे. निवडणुकीत कळेल किती माफ केलं ते. कोणाचंच असं वक्तव्य असतं तरी लाज वाटली असती. मराठी माणूस आणि बाहेरचे लोक तुम्हाला निवडायला आले तर तुम्ही मराठीला बाजूला टाकणार? संदर्भ चुकलाय का? अतिशय गंभीर आहे. एका माणसाकडून चूक होऊ शकते पण अशी चूक पुढे करू नये.”

राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,

“राजीनामा द्यावा की नाही हे राज साहेब किंवा वरिष्ठ नेते सांगतील. पण पुढे असं होऊ नये एवढंच माझं म्हणणं.”

मोर्चा आणि भाजपच्या टीकेबद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले,

“पहिलं मला ह्यांचं बघायचं आहे, सुखरूप बाहेर आले पाहिजेत. आम्ही मोठा मोर्चा काढला, त्यानंतर भाजप टीका करतेय. काहीजण म्हणतात हिंदूंची दुबार नावं दाखवलात, मुस्लिमांची का नाही? दुभार मतदार म्हणजे दुभार मतदार. त्याला धर्म नाही. मी पक्षात आहे पण आधी मतदार आहे. लोकशाही आपल्याकडून काढून घेतली तर बोलायचं नाही? आम्ही निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढला. भाजप का टीका करते? आज चौथे आमदार बोललेच ना भाजपचे, त्यांनी प्रेझेंटेशन केलं, सविस्तर सांगितलं. आम्हाला जे पाहिजे होतं ते प्लेटरमध्ये दिलं त्यांनी. माझी मागणी आहे की शोध बंद करू नये. निवडणुकीच्या आधी ती यादी आयोगालाही द्यावी आणि आमच्याकडेही. आयोगाने काही केलं नाही तर राज साहेब सांगतील काय करायचं.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा