ताज्या बातम्या

अमिताभ गुप्तांची ९० तासात पुन्हा बदली

राज्यात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात फेरबदल करण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात फेरबदल करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसातच दुसऱ्यांदा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शनिवारी पुन्हा बदली केली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांच्यावर अपर पोलीस महासंचालकपदाची (कायदा व सुव्यवस्था) जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र यास चार दिवस पूर्ण होण्याच्या आतच गुप्ता यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.

अमिताभ गुप्ता हेच आहेत ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये प्रसिद्ध बिल्डर वाधवान कुटुबींयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केली होती. गुप्ता यांची जवळीक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी असल्याने फडणवीस यांनी बदली केल्याचे म्हटले जात आहे.

गुप्ता यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे. तर गुप्ता यांच्या जागी पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद