Amol Kolhe - Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

Video : राऊत म्हणाले, खासदार सेनेचा होईल; कोल्हे म्हणतात विजय जनता ठरवेल

संजय राऊत यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Published by : Team Lokshahi

पुणे : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिरुर मतदार केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. संजय राऊत एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले की, संसदेत आमचा प्रतिनिधी नाही याचं दु:ख आम्हालाही आहे. मात्र आढळराव पाटलांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही संसदेत जाल. अनेक दरवाजे आहेत, या नाही तर त्या दरवाजाने जाल आणि माझा आत्मविश्वास तर तुम्हाला माहितीच आहे असं संजय राऊत म्हणाले. त्यावर आता अमोल कोल्हेंनीही (Amol Kolhe) या मुद्दयावर भाष्य केलं आहे.

नेता कोण असेल हे जनता ठरवते असं म्हणत अमोल कोल्हेंनी नाव न घेता संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणूक हे केवळ माध्यम आहे, पद हे केवळ साधन आहे आणि विकास हे साध्य आहे ही शरद पवारांची शिवकण आहे. शिरूर मतदार संघाच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलंय. मात्र 2024 च्या निवडणुकीचा निकाल 2022 साली सांगण्यास मी कुणी भविष्यवेत्ता नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा