ताज्या बातम्या

Amol Kolhe : आपला हा विजय म्हणजे केवळ मतांची बेरीज - वजाबाकी नाही, हा महाराष्ट्राने देशाला दिलेला खरमरीत संदेश आहे

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होती. या लढतीत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले.

याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, हा विजय शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समर्पित. मायबाप जनतेचा आशीर्वाद, स्वाभिमानी सहकाऱ्यांची साथ, लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस नेते श्री. राहुलजी गांधी, आम आदमी पार्टीचे श्री. अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेला विश्वास या बळावर आपण हा विजय मिळवला आहे.

यासोबतच ते म्हणाले की, आपला हा विजय म्हणजे केवळ मतांची बेरीज - वजाबाकी नाही, हा महाराष्ट्राने देशाला दिलेला खरमरीत संदेश आहे. महाराष्ट्रासोबत गद्दारी कराल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान कराल तर हा स्वाभिमानी महाराष्ट्र शांत बसणार नाही, महाराष्ट्राचा हाच करारी बाणा कायम ठेवत यापुढेही महाराष्ट्राच्या हितासाठी संसदेत लढत राहणार हा शब्द आहे. या संघर्षात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार! जय शिवराय ! असे अमोल कोल्हे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार

Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; हेल्पलाइन नंबरवर अज्ञाताचा कॉल

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहताय? म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु