Admin
ताज्या बातम्या

हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार; आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला आहे. नागपूरमधील आमदार निवासामधील हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये आमदार निवासामधील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा कसा वापर केला जातो आहे. हा व्हिडिओ शेअर करुन त्यांनी लिहिले की, हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच त्यांनी कोट्यवधींचे टेंडर देऊनही अशी चुकीच्या पद्धतीने आमदारांच्या जेवण आणि चहापाण्याची व्यवस्थी केली जाते. अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्याचा त्यांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांना सरकारवर टीका करत कंत्राटदारावरही टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा