काही महिन्यापासून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू असलेलं वाक्य युद्ध थांबलं होतं. मात्र, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावर आता अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुन्हा दिसून येत आहे .
अजित पवारांप्रमाणे लवकर उठून कामं करा
आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकसभेत एक जागा मिळवणाऱ्या अजित पवारांना 42 जागा विधानसभेत कशा मिळाल्या? असा सवाल उपस्थित केला आहे. यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्योत्तर दिल आहे. स्वतःच्या मुलाला विधानसभेत निवडून आणू न शकणारे राज ठाकरे यांनी सकाळी उठून अजित पवार ज्याप्रमाणे काम करत आहेत त्याप्रमाणे काम कराव असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंचा निकालावरुन अजित पवारांवर निशाणा
भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या ठीक आहे. पण अजित पवार 42? चार-पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 जागांवर आले. चार-पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 जागांवर आले, कोणाचा तरी विश्वास असेल का? ज्यांच्या जीवावर सगळे मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात.
शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले त्यांचे दहा आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला त्यांचे 42 आमदार येतात. लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते केलेला मतदान कुठेतरी गायब झालं, अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुकांना लढवल्या तर बरं, असं देखील मनसे पक्षप्रमुखे राज ठाकरे म्हणाले आहेत.