इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला आहे. याची माहिती स्वत: इंद्रजीत सावंत यांनी दिली असून धमकीचा ऑडिओ हा आपल्या फेसबुक अकांऊटवरून शेअर केला आहे. हा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा या व्यक्तीने आरोप केला आहे. यासोबतच घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा', असं म्हणत इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोल्हटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून दिलेल्या धमकी मधील संभाषणाची क्लिप चिड आणणारी आहे. कोल्हटकर यांनी हे आरोप फेटाळले असले तरी इतकं भयंकर कोण व कशासाठी बोललय याची सखोल चौकशी राज्य सरकारने करुन संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी. असे अमोल मिटकरी म्हणाले.