थोडक्यात
अमरावतीत थंडीचा जोर वाढला
अमरावती जिल्हातील मेळघाट गारठले
माखलाचं तापमान ५ डिग्री तर चिखलदरा ६ अंश सेल्सिअस
सूरज दहाट, अमरावती
राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. थंडीमुळे अमरावती जिल्हातील मेळघाट गारठले असून मागील चार दिवसापासून पुन्हा कडाक्याची थंडी पडू लागली आहे.
मेळघाटातील सर्वात उंच ठिकाण असलेले माखला येथे पहाटे तीन वाजता 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून चिखलदरा पर्यटन स्थळावर 6 अंश सेल्सिअस तापमान असल्याची माहिती मिळत आहे.
मेळघाटमध्ये प्रचंड थंडी पडू लागल्याने चिखलदरा पर्यटन स्थळासह सीमाडोह कोलकास माखला येथील दऱ्याखोऱ्यांमध्ये दवबिंदू गोठू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.