महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काही वेळातच देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आपण अनेकदा जाणून घेतलं आहेच. मात्र, आज आपण देवेंद्र फडणवीस यांची अमृता फडणवीस यांच्याशी ओळख कशी झाली तो किस्सा जाणून घेणार आहोत.
फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात. फडणवीस यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांच्या पत्नी अमृता या अभिनेत्री आणि गायिका यांनी त्यांची कारकीर्द सांभाळली आहे. फडणवीस आणि अमृता यांचे २००५ मध्ये लग्न झालं.
अवघ्या तास-दीड तासांच्या गप्पांमध्ये प्रेमात पडले
फडणवीस आणि अमृता यांचं अॅरेंज मॅरेज आहे. अमृता या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चारुलता रानडे यांच्या कन्या आहेत. त्यावेळी अमृता या बँकर होत्या. दोघांनाही एका कॉमन फ्रेंडच्या घरी बोलावण्यात आलं.
कॉमन फ्रेंड शैलेश जोगळेकर यांच्या घरी ही भेट ठरली. ते जेव्हा भेटले तेव्हा अमृता आणि फडणवीस दोघांचे बोलणे झालं. बोलण्याच्या ओघात दीड तास केव्हा निघून गेला ते कळलंही नाही. लग्नाची बोलणी सुरू होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आमदार झाले होते. पण अमृता या सुरुवातीला राजकारणाबाबत साशंक होत्या.
फडणवीस यांनी कशी पुसली अमृता यांच्या मनातील राजकारण्यांविषयीची नकारात्मक प्रतिमा?
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी शेअर केले की, “देवेंद्र कोणत्या प्रकारचे व्यक्ती असतील याविषयी आपण त्यांना भेटण्यापूर्वी तणावात आणि दडपणाखाली होतो. राजकारण्यांविषयी आपल्या मनात नकारात्मक प्रतिमा होती. मात्र, फडणवीस यांना भेटताच ही भीती नाहीशी झाली. अमृता यांना ते प्रामाणिक आणि डाउन टू अर्थ असल्याचे जाणवलं.
देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय कारकिर्दीत व्यस्त असताना, त्यांची पत्नी गायन, अभिनय आणि इतर सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने कायम चर्चेत असतात.