ताज्या बातम्या

Pune : धक्कादायक, पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बाकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्याने महिला कर्मचारी बचावल्या असून या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना..

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार