थोडक्यात
दिवाळी खरेदीत 'यूपीआय' सुसाट...
3 दिवसात दररोज 73 कोटी 7 लाख यूपीआय व्यवहार..
धनत्रयोदशी ते दिवाळी मोठे 'यूपीआय' व्यवहार...
UPI Transactions In Diwali : दिवाळी सण जोरदार साजरा केला जात आहे. अनेकजण गिफ्ट देण्यासाठी खरेदी करत असल्याचे दिसत असून बाजारपेठामध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. डिजीटल व्यवहाराचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवाळीच्या तीन दिवसात UPI द्वारे तब्बल इतक्या कोटींचा व्यवहार झाला आहे.
धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस'ने म्हणजेच यूपीआयने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. National Payments Corporation of India (NPCI) 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या आकडेवारीनुसार, या काळात यूपीआय व्यवहारांची वाढ इतर सर्व पेमेंट पद्धतींपेक्षा वेगाने झाली. लोक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचे यावरुन दिसते. धनत्रयोदशी ते दिवाळी या 3 दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी ७३.७ कोटी यूपीआय व्यवहार झाला.