बच्चू कडूंचा मोर्चा नागपुरात धडकलाय. कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महा एल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा बच्चू कडू यांना महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. आजुबाजूला शाळा, रुग्णालय, कॉलेज असल्याचं कोर्टाकडून नमूद करत, हायकोर्टाने मीडिया रिपोर्ट वरून स्वतः दाखल करून याचीका घेतली होती.
यावर बच्चू कडू यांच्याकडून प्रतिसाद आला असून बच्चू कडू म्हणाले की, " लोकांचा निर्णय घेऊन समोर जाऊ.. लोक उठा म्हणतील तर उठू,न्यायालय परस्पर निर्णय घेत असेल तर फार सोयीचं वाटत नाही... कापल्या जाऊ मात्र झुकणार नाही... निर्णय झाल्याशिवाय हटणार नाही.. कोर्टाच्या आदेशाचे आम्ही आदर करतो. मात्र मला लोकांनी उभे केलं आहे.. लोकांनी उभा राहायला सांगितलं तर उभे राहू, बसायला सांगितल तर बसू".
"आम्हाला पोलिस आयुक्तांनी दहा महिन्यापासून मागून परवानगी दिली नाही.. ते पोलिसाची ड्युटी करत नाही.. तर भाजपच झेंडा फडकवत आहेत... सहा वाजेपर्यंत मैदान खाली करण्याचे आदेश आता आलेत.. सहा वाजता उठण्याचे आदेश पाच वाजता आले... सरकारच्या हिशोबाने काम सुरू आहे का अस वाटू लागलं आहे.... आता लोकन्यायालय आणि विधीन्यायालय यामधील हा संघर्ष... कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही.. पण जनभावनेचा आदर आहे", असं बच्चू कडू म्हणाले आहेत.