ताज्या बातम्या

RBI Changes Rule : आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्वाचा नियम बदलला, जाणून घ्या...

आज म्हणजे 4 ऑक्टोंबर 2025 पासून मोठा बदल बँकिंग सिस्टिममध्ये (Banking System) होणार आहे. 4 ऑक्टोंबरपासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम (Fast Cheque Clearance System) भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • 4 ऑक्टोंबरपासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम

  • सुरुवातीला कुठल्या शहरात लागू होणार नियम?

  • ग्राहकांना काय अपील केलय?

आज म्हणजे 4 ऑक्टोंबर 2025 पासून मोठा बदल बँकिंग सिस्टिममध्ये (Banking System) होणार आहे. 4 ऑक्टोंबरपासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम (Fast Cheque Clearance System) भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, चेक जमा केल्यानंतर पैसे त्याचदिवशी खात्यात येतील. 2 ते 3 दिवस त्यासाठी पूर्वीप्रमाणे वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

आतापर्यंत चेक क्लियरेंससाठी काही दिवसांचा वेळ लागायचा. पण आता RBI ने नव्या व्यवस्थेतंर्गत Continuous Cheque Clearing मोड सिस्टिम सुरु केली आहे. या अंतर्गत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जितके चेक येतील, त्यांची इमेज आणि डेटा तात्काळ स्कॅन करुन क्लियरिंग हाउसला पाठवला जाईल. त्या अंतर्गत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेत कन्फर्म करावा लागेल. बँकेने वेळेत उत्तर दिलं नाही, तर चेक ऑटोमॅटिक क्लियर मानला जाईल.

नवीन नियम 2 टप्प्यात होणार लागू

टप्पा 1 : 4 ऑक्टोंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेकची पुष्टि करण्याचा वेळ असेल.

टप्पा 2 : 3 जानेवारी 2026 पासून बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी केवळ 3 तासांचा वेळ मिळेल. सकाळी 10 वाजता चेक जमा केला तर दुपारी 2 वाजेपर्यंत तो चेक क्लियर करावा लागेल. त्यामुळे चेक क्लियरेंस अजून वेगवान होईल.

सुरुवातीला कुठल्या शहरात लागू होणार नियम?

ही नवीन व्यवस्था सुरुवातीला दिल्ली, मुंबई, चेन्नई या मोठ्या शहरात क्लियरिंग ग्रिडवर लागू होईल. नंतर देशभरात हा नियम लागू केला जाईल. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. चेक वठण्याचा अनुभव अजून चांगला होईल.

ग्राहकांना काय अपील केलय?

RBI ने मोठ्या अमाउंटच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यात ग्राहक बँकांना चेकच महत्वपूर्ण विवरण आधीच सांगून ठेवतात. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. चुकीचे चेक ऑटोमॅटिकली क्लियर होणार नाहीत.

या परिवर्तनाचा ग्राहक आणि व्यवसाय दोघांना फायदा होईल. ग्राहकांना वेगात पैसे मिळतील. देण्या-घेण्याच्या व्यवहारातील अनिश्चितता कमी होईल. व्यवसायात कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. बँकिंग प्रणालीत कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढेल.

RBI ने मोठ्या अमाउंटच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यात ग्राहक बँकांना चेकच महत्वपूर्ण विवरण आधीच सांगून ठेवतात. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. चुकीचे चेक ऑटोमॅटिकली क्लियर होणार नाहीत.

या परिवर्तनाचा ग्राहक आणि व्यवसाय दोघांना फायदा होईल. ग्राहकांना वेगात पैसे मिळतील. देण्या-घेण्याच्या व्यवहारातील अनिश्चितता कमी होईल. व्यवसायात कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. बँकिंग प्रणालीत कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढेल.

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान

Pomegranate Vs Beetroot : डाळिंब की बीट... शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे?

Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या मेळाव्यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....