Indigo Airlines : मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात; सुदैवानाने कोणतीही जीवीतहानी नाही Indigo Airlines : मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात; सुदैवानाने कोणतीही जीवीतहानी नाही
ताज्या बातम्या

Indigo Airlines : मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात; सुदैवानाने कोणतीही जीवीतहानी नाही

इंडिगो अपघात: मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा टेल स्ट्राईक; सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही.

Published by : Riddhi Vanne

मुंबई विमानतळावर शनिवारी पहाटे इंडिगो एअरलाईन्सच्या एअरबस A321 (VT-ICM) विमानाला ‘टेल स्ट्राईक’ (Tail Strike) ची घटना घडली. बँकॉकवरून आलेले हे विमान (फ्लाईट क्रमांक 6E 1060) मुसळधार पावसामुळे लो-आल्टिट्यूड गो-अराउंड करत असताना विमानाच्या मागच्या भागाचा (टेल) धक्का रनवेवर बसला. मात्र, सुदैवाने विमानाने त्यानंतर दुसरा प्रयत्न करून सुरक्षितपणे सुमारे पहाटे 3 वाजता लँडिंग केले.

इंडिगोचे अधिकृत निवेदन

या घटनेबाबत इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितले की,

"१६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील प्रतिकूल हवामानामुळे इंडिगोच्या एअरबस A321 विमानाचा रनवेवर शेपूट धडकले. त्यानंतर विमानाने दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे लँडिंग केले. आता विमानाचे नियमानुसार तपासणी, दुरुस्ती आणि DGCA कडून मंजुरी मिळाल्यानंतरच ते पुन्हा उड्डाण करेल."

‘टेल स्ट्राईक’ म्हणजे काय?

एव्हिएशन वेबसाईट Skybrary नुसार, टेल स्ट्राईक म्हणजे विमानाच्या मागील भागाचा रनवेवर धक्का बसणे. हे बहुतेक वेळा टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान घडते. तांत्रिक दृष्ट्या हे मानवी चुकांमुळे होण्याची शक्यता जास्त असते; मात्र जोरदार वा झोताचे वारे, मुसळधार पाऊस किंवा प्रतिकूल हवामान अशा बाह्य घटकांमुळेही धोका वाढतो.

प्रवाश्यांचे सुदैव

सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, सातत्याने घडणाऱ्या अशा घटना प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण करत आहेत. DGCA कडून याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा