ताज्या बातम्या

तुरुंगात ऑफर मिळाली होती, जर ती ऑफर घेतली असती तर...; अनिल देशमुखांचा दावा

Published by : Siddhi Naringrekar

अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते आणि आता जामिनावर बाहेर आहेत. अनिल देशमुख यांनी वर्धा येथील सेवाग्राम येथे नदी व वन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्याॉ एनजीओच्या सामूहिक वनहक्कांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत असताना त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर १०० कोटी रुपयांचा (मनी लाँड्रिंग) आरोप आहे, मात्र आरोपपत्रात ही रक्कम१.७१ कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपास यंत्रणा १.७१ कोटी रुपयांचे पुरावे देथीस सादर करण्यात अपयशी ठरली.असे देशमुख म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, मला तुरुंगात एक ऑफर आली होती, जी मी नाकारली. जर मी ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी पडले असते, पण माझा न्यायावर विश्वास आहे. म्हणून मी तुरूंगातून बाहेर सुटका होण्याची वाट पाहत होतो. असे अनिल देशमुख म्हणाले.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा