बोरिवलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या अपघातातच्या घटना वारवांर घडताना दिसत आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबईमध्ये एक विचित्र अपघात पाहायला मिळाला आहे. पबमधील पार्टीनंतर घरी निघालेल्या तरुण-तरुणीमध्ये वाद झाल्याने एक दुर्दैवी अपघात घडला.
नेमकं प्रकरण काय?
बोरिवलीत पबमधून पार्टीनंतर घरी निघालेल्या तरुण-तरुणीमध्ये वाद झाल्याने एक दुर्दैवी अपघात घडला. वादानंतर तरुणी गाडीतून खाली उतरली. मात्र ती बाजूला न होता कारच्या बोनेटवर बसली. यानंतर मात्र मद्यधुंद तरुणाने कार फरफटत पुढे घेऊन गेला. त्यामुळे तरूणी खाली पडून जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.