ताज्या बातम्या

Sanjay Raut : अ‍ॅनाकोंडा काहीही गिळतो... राऊतांच्या रोष नेमका कोणावर ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरातून राज्यातील सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भातील मागण्या आणि अल्टिमेटम सरकारला दिला गेला आहे. राऊत म्हणाले

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • बच्चू कडू आणि अर्बन नक्षलवादाचा आरोप

  • भ्रष्टाचार आणि सरकारी अनियमिततेवर टीका

  • शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरातून राज्यातील सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भातील मागण्या आणि अल्टिमेटम सरकारला दिला गेला आहे. राऊत म्हणाले, “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यास विविध मागण्या आहेत आणि 12 वाजेपर्यंतच आज दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला गेला. सर, त्यात वेळ पडली तर आमदारांना देखील कापा, अस देखील त्यांनी म्हटले. मंत्र्यांना… कोण म्हणतय? उपकार मंत्र्यांना कापा.” राऊत यांनी थेट भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “मग आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात ते सुरू आहे, ते तोंडाला पट्टे बांधून का बसले? किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू, हे बच्चू कडू यांना अर्बन नक्षल ठरवायचा प्रयत्न होतो. काय शहरी नक्षलवाद या राज्यामध्ये कोणी आंदोलन केलं?”

बच्चू कडू आणि अर्बन नक्षलवादाचा आरोप

राऊत म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीच्या मुद्द्यावर, मतदार यादीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या तर सगळ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवायचं. आता बच्चू कडू हे एक आंदोलन करताय. बच्चू कडू कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते. मधला काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते. पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले, किवा हजारोच्या संख्येत लोक त्यांच्याबरोबर चालतायत हे अर्बन नक्षलवादी झाले.” राऊत यांनी स्पष्ट केले की मूळ मागणी म्हणजे “सातबारा कोरा करा” ही उद्धव ठाकरे यांची मागणी होती आणि “जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे.”

भ्रष्टाचार आणि सरकारी अनियमिततेवर टीका

भ्रष्टाचाराच्या विषयावर राऊत म्हणाले, “आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं, मग भ्रष्टाचार अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? तुमच्या मंत्रिमंडळातल्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही?”

त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक-त्रंबकेश्वर रोडवरील भ्रष्टाचारावर देखील टीका केली. राऊत म्हणाले, “साधारण 15 ते 20 हजार कोटींचा बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचे आणि त्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात काम द्यायची. सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचे कार्य सुरू आहे.” राऊत यांनी शेतकऱ्यांच्या उपोषणाचे उदाहरण दिले: “शेतकरी उपोषणाला बसले आहेत. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या घरांवर, व्यवसायावर, दुकानांवर बुलडोजर फिरवून हजारो शेतकऱ्यांना उद्वस्त केले आहे. साधारण 12 ते 13 गावांचे शेतकरी त्रंबक रस्त्यामुळे उपोषणाला बसले आहेत.”

शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याची टीका

राऊत म्हणाले, “शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का? मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही. काल मुख्यमंत्री खोट बोललेत. कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले? आम्ही हवाल दिला आहे सोलापूरचा शेतकरी, विदर्भातला शेतकरी. आणि तुम्ही मजा मारताय, भाजपचे टॉवर्स चौपाटीवर उभे करताय. पाठिंबा देताय बच्चूकडून, तुमची कधी काही सहकारी ना, आमच्या सहकारी आहेत. बघा इथे सहकारी असण्याचा आणि नसण्याचा प्रश्नच नाही.”

राजकीय आरोप – बच्चू कडू, भाजप आणि आंदोलन

राऊत म्हणाले, “बच्चू कडूनच आंदोलन हे शेतकऱ्यांच आंदोलन होते. हे सगळे कधी काळी शरद जोशी यांचे समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते होते. शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना होती. शरद जोशी बरोबर मी सुद्धा काम केलेय. प्रत्येक शेतकऱ्याचा आणि प्रत्येक पक्षाचा पाठिंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र असायला पाहिजे.”

बावनकुळे प्रकरणावर थेट इशारा

राऊत यांनी बावनकुळ्यांबाबत स्पष्ट केले: “बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण मी दोन दिवसात बाहेर काढतो. 52 कुळ्यांचे घोटाळे मी बाहेर काढतो. तुम्ही त्यांना पाठवता, त्यांच्या प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरा व्हावा.”

अॅनाकोंडा – सत्तेवरील टिका

राऊत यांनी ‘अनाकोंडा’ हा उपमा वापरत राज्यातील सत्तेवर जोरदार टीका केली: “अनाकोंडा काही गिळतो? अनाकोंडा काहीही गिळतो. अनाकोंडा भूखंड गिळतो, विधानसभा गिळतो, देशाचा सुप्रीम कोर्ट गिळतो, निवडणूक आयोग गिळतो, मरीन लायन्सवरचे भूखंड गिळतो. अनाकोंडा पासून सावध राहा. अनाकोंडाला आता मुंबई गिळायचंय. अनाकोंडाला मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचंय.” राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली: “एकनाथ शिंदे हे अनाकोंडाचा पिल्लू आहे. त्याचा बाप अनाकोंडा दिल्लीत आहे. अनाकोंडाने काय काय गिळल ते सामना वाचला तर कळेल. हा अनाकोंडा फक्त पैशाने भरलेले कंटेनर गिळतो. डायट असतो, उपवासाचे पदार्थ म्हणून फक्त पैशाने भरलेले कंटेनर खातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा