Anand Mahindra On MS Dhoni
Anand Mahindra On MS Dhoni 
ताज्या बातम्या

Anand Mahindra : धोनीची धडाकेबाज फंलदाजी पाहून महिंद्रांनाही झाला 'आनंद'! म्हणाले, "माझं नाव माहीं-द्रा..."

Published by : Naresh Shende

महिंद्रा ग्रुपचे चेयरमन आनंद महिंद्रा एम एस धोनीचे चाहते आहेत, यात काही शंका नाही. धोनी क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा धावांचा पाऊस पाडतो, तेव्हा आनंद महिंद्रा ट्वीटरवर प्रतिक्रिया देतात. मुंबई इंडियन्स विरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं हार्दिकच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले. धोनीच्या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच आता आनंद महिंद्रा यांनीही ट्वीटरच्या एका पोस्टवर रिप्लाय देत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महिंद्रा यांनी ज्या अंदाजात धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहेत, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धोनीनं ४ चेंडूत २० धावा कुटल्या. धोनीची धडाकेबाज फलंदाजी पाहून आनंद्र महिंद्राही इम्प्रेस झाले असून सोशल मीडियावर त्यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

महिंद्रा यांनी धोनीबाबत म्हटलंय की, कोणत्याही अपेक्षा नसताना आणि दबावात धोनीपेक्षा चांगला खेळणारा एकतरी खेळाडू मला दाखवा. हे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. मी आभारी आहे की, माझं नाव माहीं-द्रा आहे. ४२ वर्षांच्या धोनीनं ज्याप्रकारे चाहत्यांची मनं जिंकली आहेत, ते अद्वितीय आहे. मुंबई विरोधात धोनीनं चमकदार कामगिरी केली. चाहत्यांनाही धोनीकडून नेहमी अशीच अपेक्षा असते. शेवटच्या षटकात धोनी फलंदाजी करायला आला आणि हार्दिकच्या गोलंदाजीवर लगातार तीन षटकार ठोकले.

धोनीने ४ चेंडूत २० धावा कुटल्या. धोनीच्या धावांच्या जोरावर सीएसके २०६ धावांपर्यंत मजल मारू शकली. तर मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने ६३ चेंडूत १०५ धावांची नाबाद शतकी खेळी केली. रोहितने आयपीएमध्ये दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. १२ वर्षानंतर रोहितने आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकार ठोकून रोहितने इतिहास रचला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...