आनंदावर आता विरजण पडणार आहे अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंदाचा शिधा या योजनेवरून टीका केली आहे. आमंदाचा शिधा सप्लायर आणि कंत्राटदारांचा पोट भरण्यासाठीच होता असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना हळुहळु बंद होणार आहेत असा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदेनी सुरु केलेली आनंदाचा शिधा योजना सुरुच राहणार आहे. आनंदाचा शिधा बंद होणार नसून त्याच्यावर सोमवारी निर्णय होईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सरकारकडे तिजोरी खडखडाट आहे. आनंदाचा शिधा प्रत्येक सणाला देणार असं म्हटल होत पण या आनंदाच्या शिधावर विरजण येणार आहे. निवडणुकीत स्वतकंग चेहऱ्याला रंग लावला आहे, त्यामुळे जनता बेरंग झाली आहे".
"त्यामुळे ज्या ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजनांवर कात्री लावण्याचं काम सुरु आहे. तस ही आनंदाचा शिधा हा ठेकेदारांचा आणि सप्लायरचा पोट भरण्यासाठीच आणला होता. त्यातून कमिशन खाण्याचं काम मंत्र्यांपासून सगळ्यांनीच केलं आहे".