Andhra pradesh stampede during chandrababu naidu road show 
ताज्या बातम्या

Video : माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत चेंगराचेंगरी; 8 जणांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी

आंध्रप्रदेशातून एक भयंकर घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू ( Chandrababu Naidu Andhra Roadshow ) यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

आंध्रप्रदेशातून एक भयंकर घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कुंडुकूर येथे ही घटना घडली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये झालेली घटना स्पष्ट दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांसह आरोग्य विभागाचे डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कुंडुकूर येथे ही घटना घडली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये झालेली घटना स्पष्ट दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांसह आरोग्य विभागाचे डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी या वेदनादायक घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. कंदुकूर येथील ईडेमी खरमा कार्यक्रमांतर्गत एनटीआर सर्कलमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी