Nandurbar News : नंदुरबारांच्या 'त्या' घटनेचा केला Lokशाही मराठीने पाठपुरावा; माणिकराव कोकाटेंचे चौकशीचे आदेश Nandurbar News : नंदुरबारांच्या 'त्या' घटनेचा केला Lokशाही मराठीने पाठपुरावा; माणिकराव कोकाटेंचे चौकशीचे आदेश
ताज्या बातम्या

Nandurbar News : नंदुरबारांच्या 'त्या' घटनेचा केला Lokशाही मराठीने पाठपुरावा; माणिकराव कोकाटेंचे चौकशीचे आदेश

शहादा तालुक्यातील घटनेवर संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Published by : Riddhi Vanne

शहादा तालुक्यातील रामभरोसे हॉस्पिटलमधील निष्काळजीपणामुळे एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ती महिला वय ५० ते ५५ वर्षांच्या आसपास होती. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या तब्येतीत काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे ती रुग्णालयातून घराकडे परत गेली. मात्र, पाचशे मीटर दूर जाताच ती बेशुद्ध पडली. ती सहा दिवस रस्त्याच्या कडेला पडून होती, पण कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालय कर्मचार्‍याने तिला मदत केली नाही.

स्थानिक लोकांनी सांगितले की महिलेस गंभीर स्थितीत असताना अनेकांनी डॉक्टरांना खबर दिली, पण डॉक्टरांनी मदतीचे काहीही प्रयत्न केले नाहीत. काही डॉक्टर त्या मार्गाने जात असताना महिलेकडे लक्ष देखील दिले नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

इन्कलाब फाउंडेशनने या घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केली. फाउंडेशनच्या प्रतिनिधी भारती पवार आणि संदीप राजपाल यांनी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.

इन्कलाब फाउंडेशनचे कार्यकर्ते भारती पवार म्हणाल्या, "महिलेच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर कडक कारवाई व्हावी. ही घटना फक्त दुर्लक्षाची नाही, तर मानवी संवेदनांची हानी आहे. समाजात असहिष्णुता वाढवू नये."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा