Mumbai Crime : मुंबई हादरली! रात्री झोपत नसल्याच्या रागातून सावत्र वडिलांनी घेतला चिमुकलीचा जीव Mumbai Crime : मुंबई हादरली! रात्री झोपत नसल्याच्या रागातून सावत्र वडिलांनी घेतला चिमुकलीचा जीव
ताज्या बातम्या

Mumbai Crime : मुंबई हादरली! रात्री झोपत नसल्याच्या रागातून सावत्र वडिलांनी घेतला चिमुकलीचा जीव

मुंबई हादरली: सावत्र वडिलांनी पाच वर्षाच्या मुलीचा जीव घेतला, पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Published by : Team Lokshahi

Mumbai Crime : मुंबईमध्ये सावत्र वडिलांकडून पाच वर्षाच्या मुलीला जीवे मारण्यात आले आहे. मुलगी रात्री झोपत नसल्याचा राग मनाशी धरून तिच्या सावत्र बापाने तिला जीवानिशी मारले. याबाबत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबईमधील अँटॉपहिलमधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमायरा नामक मुलीला तिच्या सावत्र वडिलांनी जीवानिशी मारले. इतक्यावरच न थांबता त्याने त्या मुलीचा मृतदेह समुद्रामध्ये फेकून दिला. अमायरा ही आपली आई नाझियासोबत राहत होती. अमायरा ही नाझियाला पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती. तिच्या आईचा दोन वेळा घटस्फोट झाला होता. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजे इम्रानसोबत राहत होती. ही लहानगी अमायरा इम्रानला वडिलांच्या नात्याने अब्बू म्हणून हाक मारायची. मात्र या गोष्टीची इम्रानला चीड यायची. इतकेच नाही तर अमायरा ही रात्रीची लवकर झोपत नसे. ती सारखी मोबाईलवर खेळत बसायची त्यामुळे नाझिया आणि इम्रान यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अडथळे येत होते. हा राग इम्रानच्या मनात बरेच दिवस होता. याच रागातून त्याने अमायराची गळा आवळून हत्या केली आणि त्यानतंर मृतदेह समुद्रात फेकला.

अमायराला मारल्यानंतर त्याने कोणालाही संशय येऊ नये किंवा आपण पकडले जाऊ नये यासाठी तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. घरी परतल्यावर नाझिया अमायराचा शोध घेताना त्याला दिसली. त्याबरोबर त्याने सुद्धा तिचा शोध घेण्याचे नाटक केले. त्या दोघांनी अँटॉप हिल पोलीस स्टेशनला जाऊन अमायरा हरवल्याची रीतसर तक्रार केली. पोलिसांचा शोध सुरु होता. दरम्यान, मंगळवारी अमायराचा मृतदेह मच्छीमार गोपी धनु यांना ससून डॉकजवळ समुद्रावर सापडला. यादरम्यान परिमंडळ चारचे उपयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १६२ सीसीटीव्ही मधील फुटेज तपासले .त्यात अमयाराचा खून होण्यापूर्वी ती इम्रानबरोबर असल्याचे त्यावेळी लक्षात आले. त्याबरोबर या प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणात पोलिसांनी इम्रानला वरळीमधून अटक केली. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली त्यावेळी खरा प्रकार सगळ्यांच्या समोर आला.सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा