ताज्या बातम्या

'राजकारणातील टरबूज्या...' अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा

अनिल देशमुख यांच्या 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' पुस्तकातील देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणारे उतारे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना राजकीय वातावरण तापले.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. याच्या काही आठवड्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील टरबूज्या म्हणून उल्लेख करण्यात आलं आहे.

अनिल देशमुख यांनी आज सकाळी गौप्यस्फोट करणार असे संकेत दिले होते. त्यासाठी त्यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केलं होतं. ज्यात देवेंद्र फडणवीस, उंदीर आणि टरबूज दिसत होतं. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या त्यांच्या पुस्तकातले दोन उतारे त्यांनी पोस्ट केले आहेत.

या पुस्तकातील एक उतारा ट्विट करत अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला आहे. ट्विट करत म्हणाले, माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा