ताज्या बातम्या

विधान परिषदेसाठी धडपड, देशमुख-मलिक यांच्या याचिकेवर उद्या दुपारी 'निकाल'

नवाब मलिक (Nawab Malik) आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विधान परिषद (Vidhan Parisad) निवडणुकीसाठी मतदान करता यावं, यासाठी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) सुनावणी सुरू आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering case) न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विधान परिषद (Vidhan Parisad) निवडणुकीसाठी मतदान करता यावं, यासाठी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून आहे. उद्या दुपारी अडीच वाजता निर्णय देणार असल्याचं न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिका/अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोर्टाला विनंती करुनही मलिक-देशमुखांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला. आता विधान परिषद निवडणुकीत पुन्हा धक्का बसू नये, यासाठी आघाडी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर मलिक-देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करता यावं, यासाठी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची संधी द्यावी, अशी विनंती अमित देसाई यांनी हायकोर्टाला केली आहे. "केवळ मतदानाच्या दिवशी मत टाकण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्याचे निर्देश द्यावेत, एवढीच मर्यादित विनंती आहे", असं अनिल देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?