Anil Parab Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

"अनिल परबांवरची कारवाई सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान"

ED Raids on Anil Parab : मंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय यंत्रणांवर आरोप.

Published by : Sudhir Kakde

मुंबई | सुमेध साळवे : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसोर्टसह 7 विविध ठिकाणांवर ED तर्फे छापेमारी टाकले. तसेच अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. त्यानंतर आता मंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यावर बोलताना म्हणाले की, ईडीची कारवाई म्हणजे एक प्रकारचं दबावतंत्र असून हे लोकशाहीला घातक आहे. सुडापोटी कारवाई योग्य नाही, सत्ता येते जाते, यापूर्वी अनिल परब यांची चौकशी झाली आहे. बीएमसी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारवाई करणे उचित नाही. राजकारणासाठी अशी कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. त्यांच्यावर झालेली कारवाई ही दुर्देवी असून, हे सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. मुंबई महापालिका अशा कारवाया करून जिंकून येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर अशा कारवायांमुळे दबाव येणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार