Anil Parad Team Lokshahi
ताज्या बातम्या

ED Raids on Anil Parab : 11 तासांच्या झाडा-झडतीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर

ईडीच्या निशाण्यावर अनिल परब; शिवसेनेकडून आरोप

Published by : Sudhir Kakde

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसोर्टसह 7 विविध ठिकाणांवर ED तर्फे छापेमारी टाकले. तसेच अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. दिवसभर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना ईडीचं पथक अनिक परब यांच्या घरात चौकशी करत होतं.

ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्याशी संबंधीत तब्बल 7 मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये मुंबईतील काही संपत्ती, दापोलीतील अनिल परब यांचा रिसॉर्ट, पुण्याच्या कोथरुडमधील काही संपत्ती अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर कागदपत्र घेऊन ईडीचं पथक अनिल परबांच्या घराबाहेर पडलं. अनिल परब यांच्या घरात तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या व्यवहारांशी संबंधीत कागदपत्र ईडीने ताब्यात घेतले. त्यामुळे आता ईडी यापूढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप