ताज्या बातम्या

Anil Parab : थेट भाजपच्या आमदारांवर मोठे आरोप, परब यांनी गाजवलं भाषण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनिल परब यांनी संभाजी महाराजांच्या उदाहरणाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली. भाजप आमदारांवर थेट आरोप करत परब यांनी भाषण गाजवलं.

Published by : Prachi Nate

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी अधिवेशनात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'छत्रपती संभाजी महाराज यांना धर्म बदलण्यासाठी औरंगजेबाने जसा छळ केला, तसाच पार्टी बदलण्यासाठी माझा छळ करण्यात आला',असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं.अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

याचपार्श्वभूमिवर अनिल परब यांनी थेट भाजपच्या आमदारांवर मोठे आरोप करत अधिवेशनातलं भाषण गाजवल्याचे पाहायला मिळाले आहे. अनिल परब म्हणाले की, "सभागृहाच्या मर्यादा दोन्ही बाजूने सांभळल्या गेल्या पाहिजे. ते सांभळण्याची जबाबदारी आपली आहे, असं म्हणत सभापतींना आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सर्व अधिकार आहे", असं अनिल परब म्हणाले आहेत. "माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द गेला असले तर तो कामकाजाच्या पटलावरून काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, यांना नाही हे कोण आहेत?" असं म्हणत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर बोट दाखवले.

तसेच पुढे परब म्हणाले की, "मी मुद्दयाच बोलतो, मी काल काय बोललो, छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बलण्यासाठी छळ केला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ केला जात आहे. यात चुकीच काय आहे, यात मी चुकीच काय बोललो? आणि तरी देखील तुम्हाला चुकीच वाटत असेल की, मी काय चुकीच बोललो असेन, तर तो आपला अधिकार आहे. पण या सभागृहातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलं आहे, त्या आमदाराचे नाव श्रीकांत भारतीय आहे. पहिली त्याची माफी घ्या. कोरटकर आणि सोलापूरकरांचा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आला आहे. माझे भाषण तपासून घ्यावे. छत्रपती संभाजी महाराज माझे देव आहेत. मी काय बोललो ते पहिले बघा. शंभूराजे माझे दैवत आहेत त्यांचा अपमान मी कधीच करु शकत नाही. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभूराजेंच नाव देखील छापलेल नाही आहे", असे आरोप करत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा