Anil Parab Sai Resort
Anil Parab Sai Resort Team Lokshahi
ताज्या बातम्या

Anil Parab on ED Raid : रिसॉर्टचं सांडपाणी समुद्रात जातं म्हणून ईडीनं चौकशी केली

Published by : Sudhir Kakde

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर आज ईडीने छापे टाकले. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक त्यांच्या घरातून बाहेर पडलं. त्यानंतर अनिल परब यांनी त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, याबद्दलच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. यामागचा गुन्हा काय हे तपासलं असता लक्षात आलं की, दापोलीतील साई रिसॉर्टचे (Anil Parab Sai Resort) मालक हे सदानंद कदम आहेत. कोर्टात त्यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच हे रिसॉर्ट सुरु झालेलं नाही. मात्र असं असतानाही पर्यावरणाची दोन कलमं लावून सांडपाणी समुद्रात जातं असं सांगून तक्रार करण्यात आली. मात्र हे रिसॉर्ट सुरु नाही असं अनिल परब यांनी सांगितलं. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी दिले आणि यापूर्वी देखील उत्तर दिली असून, यापूढेही उत्तर देण्याची माझी तयारी आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसोर्टसह 7 विविध ठिकाणांवर ED तर्फे छापेमारी टाकले. तसेच अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. दिवसभर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना ईडीचं पथक अनिक परब यांच्या घरात चौकशी करत होतं.


ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्याशी संबंधीत तब्बल 7 मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये मुंबईतील काही संपत्ती, दापोलीतील अनिल परब यांचा रिसॉर्ट, पुण्याच्या कोथरुडमधील काही संपत्ती अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर कागदपत्र घेऊन ईडीचं पथक अनिल परबांच्या घराबाहेर पडलं. अनिल परब यांच्या घरात तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या व्यवहारांशी संबंधीत कागदपत्र ईडीने ताब्यात घेतले. त्यामुळे आता ईडी यापूढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...