Anil Parab | renaming Aurangabad team lokshahi
ताज्या बातम्या

Aurangabad renaming : अनिल परब यांची मोठी घोषणा, औरंगाबादच्या नामांतराचा मुहूर्त ठरला

उद्याच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करणार

Published by : Shubham Tate

Aurangabad renaming : शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जात असून फ्लोअर टेस्ट होणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. (Anil Parab's big announcement was the moment of renaming Aurangabad)

अशातचं औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करण्याची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतं करण्यात आली असल्याची माहिती यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार आहे, अशी ही घोषणा त्यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना मुंबईत भूखंड द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. राजकीय विषय कॅबिनेट बैठकीत होत नाहीत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारची धोरणांवर चर्चा होते.औरंगाबाद शहराचं नामांतरण संभाजीनगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणावा. उद्या यावर निर्णय होऊ शकेल.

तर दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं. पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं. राज्याच्या पोलीस महासंचालकांना पोलीस भरती त्वरीत सुरु करावी, असे आदेश देण्यात आले आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप