ताज्या बातम्या

Anjali Damania : 'भ्रष्टाचारचा आरोप, अडीच वर्ष शिक्षा, तरीही मंत्रिपद...'; छगन भुजबळांच्या शपथ विधीनंतर अंजली दमानिया यांनी व्यक्त केला संताप

छगन भुजबळ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आणि पिटीशन फाईल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

Published by : Rashmi Mane

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. भुजबळ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आणि पिटीशन फाईल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकशाही मराठी न्यूज चॅनेलसोबत बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अंजली दमानिया म्हणाल्या की, "काय बोलू तेच कळत नाही. दुःख होतंय, राग येतोय, संताप होतो. आपण कशासाठी लढतोय असा प्रश्न पडलाय माझ्या मनात. ज्यांच्या ज्यांच्या विरूद्ध लढले मी, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा असो, आदर्श घोटाळा असो, सगळेच जर पुन्हा असे राजकारणात येणार असतील, तर आपण कशासाठी लढतोय आणि त्यातून साध्य काय होतंय. मी आरोप नाही केले, मी सिद्ध केलंय. छगन भुजबळ यांच्याविरोधात जे मी पिटिशन फाईल केलेलं त्यात 7 स्कॅम्सची माहिती, याबरोबर अँटी करप्शन ब्युरोकडे 2 हजार 653 कोटीच्या डिप्रोफेशन अॅसेस्टची माहिती आम्ही जेव्हा दिली. तेव्हा सगळं तथ्यासकट म्हणजे बँक स्टेटमेंट्ससह दिली होती. एवढं असूनसुद्धा आणि त्याच्यात चार्जशीट फाईल झालं. अडीच वर्ष त्यांना शिक्षा झाली. त्यानंतर जर त्यांना तुम्ही असेच मंत्रिपदाची परत द्यायला लागला. तर आपण कशासाठी लढतोय, असाच प्रश्न माझ्यासमोर पडलाय. का तर हा आम्हाला संदेश आहे, सरकारकडून तुम्हा लढा आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही कितीही भ्रष्टाचाराविरोधात लढा, आम्हाला हवी ती गणितं आम्ही करणार, राजकारणात आम्हाला समीकरणं जी हवी ती आम्ही करणार, हा संदेश येताना दिसतोय, म्हणून मला प्रश्न पडलाय की मी आता लढू की नको. आजवर ओबीसी समाजासाठी तरी काय केलंय त्यांनी. मला एक माळी समाजाचा माणूस दाखवा की ज्याच भलं छगन भुजबळांनी केलंय. कुठला समाज, कुठली जनगणना, कुठल्या ओबीसी लोकांसाठी कुठला माणूस झटतोय. जर अस असतं तर माळी समाजाची परिस्थिती बदलली असती. 2 हजार 653 कोटी हे भुजबळांच्या खात्यात आहेत. माळी समाजाच्या खात्यात नाही. आता हे लोकांच्या ज्या दिवशी कळेल. त्या दिवशी खरी लोकशाही येईल. आताच्या घटकेला दुकान चालवलं जात. हे जेव्हा बंद होईल, तेव्हा खरी लोकशाही येईल."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके