Anjali Damania On Ajit Pawar  Anjali Damania On Ajit Pawar
ताज्या बातम्या

Anjali Damania On Ajit Pawar : "जनाची नाही तर..." मुंढवा भूखंडप्रकरणी अंजली दमानियांचा उपमुख्यमंत्री पवारांवर हल्लाबोल

मुंढवा येथील विवादित भूखंड प्रकरणाला मंगळवारी नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला आणि प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Anjali Damania On Ajit Pawar ) मुंढवा येथील विवादित भूखंड प्रकरणाला मंगळवारी नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला आणि प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. “जनाची नव्हे मनाची लाज असेल तर अजित पवारांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा,” अशी तीव्र टीका करत त्यांनी या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चौकशी करण्याची मागणीही केली.

जमीन पाहण्यासाठी गेल्या, पण प्रशासनाचा अडवणुकीचा प्रयत्न

अंजली दमानिया मंगळवारी मुंढवा येथे संबंधित भूखंडाची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या. मात्र गेटवर तैनात अधिकाऱ्यांनी त्यांना जागेवर जाण्यास स्पष्ट मनाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘अर्वाच्य भाषेत’ बोलून परवानगी नाकारली असल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केला. यावर त्या म्हणाल्या, “कुठल्या दबावाखाली ही मनाई करण्यात आली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. पण मी हा किस्सा इथेच सोडणार नाही. संपूर्ण माहिती गोळा करून उद्या पत्रकारांसमोर सत्य मांडणार आहे.”

सेल डीड रद्दबाबतही प्रश्नचिन्ह

मुंढवा भूखंडाचा सेल डीड रद्द केल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता. दमानियांनी या विधानावर थेट सवाल उपस्थित करत म्हटले, “अजित पवार सेल डीड रद्द करणारे कोण? ना उपमुख्यमंत्र्यांना, ना मंत्र्यांना, ना अगदी पंतप्रधानांनादेखील एखादा जमीन व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही. फ्रॉड झाल्यास हे अधिकार फक्त कोर्टाचे आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या की, स्पेसिफिक रिलिफ अॅक्टच्या कलम १६ नुसार दोन पक्षांनी फसवणूक केली असल्यास त्यांना व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नसतो. “एकतर सुरुवातीला २१ कोटी देऊन व्यवहार रद्द होणार असे सांगण्यात आले. मग ४२ कोटींचा आकडा पुढे आला. हे कायदेशीरदृष्ट्या शून्य असून, सरकारने जबरदस्तीने कुठली कारवाई केली तर मी त्याला थेट हायकोर्टात आव्हान देईन,” असा इशाराही त्यांनी दिला.

“सिंचन घोटाळ्यात राजीनामा दिला, मग आता का नाही?”

दमानिया म्हणाल्या, “सिंचन घोटाळ्यात मी आरोप केल्यावर सायंकाळी पाच वाजता अजित पवारांनी तातडीने राजीनामा दिला होता. आज तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. मग आता मनाची लाज कुठे गेली?” त्यांनी पुढे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने स्थापन केलेली चौकशी समिती ही बहुतेक पुण्यातील अधिकाऱ्यांनी भरलेली असल्याने निष्पक्ष चौकशीची अपेक्षा ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले.

समितीवर अविश्वास, राजीनाम्याची टोकाची मागणी

मुंढवा भूखंड प्रकरणात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार अडकल्याचा संशय व्यक्त केला जात असताना दमानियांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील अनेक माहितीचे धागे अद्याप गोळा करायचे आहेत आणि उद्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे करणार आहेत.

“जनाची नाही तर मनाची लाज असेल तर अजित पवारांनी त्वरित राजीनामा द्यावा,” अशी मागणी करत दमानियांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. मुंढवा जमीन प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले असून, येणाऱ्या काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी वर्तवली आहे.

थोडक्यात

  • अंजली दमानिया यांना मुंढव्यातील जमीनीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांचा नकार,

  • सगळ्या प्रकरणाचा किस पाडून बुधवारी मुंबईत घेणार पत्रकार परिषद...

  • दमानियांची माहिती .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा