ताज्या बातम्या

Anjali Damania : अंजली दमानिया यांनी निलेश मगरवर पॉवर ऑफ अटर्नीचा गंभीर आरोप; मगर यांनी आरोप फेटाळले

पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा होता. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे.

Published by : Varsha Bhasmare

पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा होता. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. पुण्याचे अजित पवार गटाचे उपमहापौर निलेश मगर यांनीही शीतल तेजवानीप्रमाणेच २०१८ मध्ये पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) केली असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर हे ही मोठे प्लेयर आहेत.शितल तेजवानीनं ८९ लोकांची पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) २००६ मध्ये केली, तर २०१८ मध्ये कुळाची जमीन दाखवून १८ लोकांच्या कुळाची पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) निलेश मगर यांनी केली. तर १८ जणांचे असे कुळ आधीच वतनाच्या असलेल्या जमिनीवर दाखवणे नियमबाह्य असल्याचा आरोप अंजली दमानीयांनी केला आहे. माजी उपमहापौर निलेश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर आहेत, खारगे समितीसमोर निलेश मगरांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील अंजली दमानीयांनी केली आहे.

तर अंजली दमानियांच्या या आरोपांवर अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे माजी उपमहापौर निलेश मगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांचे यावेळी निलेश मगर यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. माझा या जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नाही २०१८ मध्ये कुळ असलेले पासलकर आणि ढमढेरे मदत मागायला आले होते, मात्र त्यात काहीही दिसलं नाही त्यामुळे तो विषय कधीच सोडला. हा व्यवहार २०२५ मध्ये झालेला आहे त्यामुळे माझा संबंध नाही. मी लहान कार्यकर्ता आहे. पण वेळ पडली तर अंजली दमानियांवर कायदेशीर कारवाई करेन. अजित पवारांचा कार्यकर्ता असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याची शक्यता आहे, असंही दमानियांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय अंजली दमानियांनी?

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत थेट अजित पवार यांचा या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांच्या पक्षाची या जमिनीवर नजर होती, सत्तेमध्ये आल्यानंतर अजित पवारांनी मुलाच्या नावावर जमिनीच्या खरेदीची तयारी केली असाही आरोप त्यांनी केला आहे, दमानिया यांनी अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांच्यावर देखील आरोप केले आहेत, निलेश मगर यांनी 2018 मध्ये जमिनी संदर्भात पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) केली असं देखील त्यांनी म्हटलं आहे, तर निलेश मगर मुंढवा जमीन प्रकरणात मोठे प्लेयर असल्याचेही त्यांनी म्हटले, मगर यांची ही खारगे समितीने चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे,

या जमिनीवर अगदी 2018 पासून अजित पवार यांचाच डोळा होता, जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजेच पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) ही 2018 साली घेतली होती, निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते, त्यांनी पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney - PoA) कोणाकडून घेतली होती असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा