बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच प्रकरणी अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, २८ मे च्या FIR ची चौकशी झाली का ? हे तेव्हाच थांबलं असते तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते २८ मे २०२४ रोजी ह्याच आवदा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी FIR फाइल केला होता. सेक्शन्स खालील प्रमाणे
१. IPC ३६५ एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण करून गुपचूप आणि चुकीच्या पध्दतीने बंदिस्त ठेवणे.
२. आयपीसी ३८५ खंडणीसाठी व्यक्तीला दुखापत होण्याची भीती दाखवणे.
३. आयपीसी १४९ बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहे.
४. आयपीसी १४८ दंगल, प्राणघातक शस्त्रांनी सज्ज. — जो कोणी दंगल घडवून आणला असेल, प्राणघातक शस्त्राने सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले, मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल
५. आयपीसी १४३ असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास
आणि
६ शास्त्र अधिनियम ४
७ शास्त्र अधिनियम २५
हा राजकीय दबाव नाही ?
ह्याला धनंजय मुंडे जबाबदार नाही ?